Friday, July 30, 2010

अनुकूल प्रश्‍न

शैक्षणिक वर्ष : ‎1996-97

शाळा - श्री दत्त विद्यालय पिंपरखेड.

इयत्ता-7 वी,

विज्ञान, पाठ - अनुकूलन

गावशेते सर : उंट हा वाळवंटीय प्रदेशातील प्राणी आहे. तेथिल वाळू नाकात जाऊ नये म्हणून त्याच्या नाकपुड्यांवर निसर्गतः पडदा असतो. पाण्यावाचून अनेक दिवस राहता यावं यासाठी पाठीवर इनबिल्ट पखाल असते. उंट हे "अनुकूलन'चे सर्वोत्तम उदाहरण....

माझा प्रश्‍न : सर, सगळं ठिक आहे. पण मग वाटवंटातील माणसांच्या "नाकाला पडदे' आणि "पाठीवर इनबिल्ट पखाल' का नाही ?

(हा निसर्गाचा कोतेपणा की पुस्तक लिहीणारांचा या प्रश्‍नाचे उत्तर अजूनही शोधतो आहे... )

No comments: