डोळं उघडायच्या आत मायबाप गेल्यावर
आजीचा इटल्येला वला पदर चोखून जगलास
इट्टी दांडू, निंगुरच्या ख्यळायच्या दिसात
बापजाद्यांच्या कर्जापायी सालं काढलीस
वाण्याघरी राबलास बैलावाणी घाण्यावर
भरलं ताट सारून लीद भरलीस घोड्यांची
मनगटाला धुमारं फोडलंस नेकीनं, घामानं
तुझी गाणी गात्यात सुरकुतल्यालं गळं आजून
तुपल्या हातचं नाडं, सौंदर, घंट्या न् बाशिंगं
आजून हायेत खिरपाळात, आजीच्या फुकणीसह
आज्या तुपल्या ताठ कण्यावरच उभाय गॉतावळा
तुझं बी आज वड व्हवून लगडलंय पारंब्यांनी
दोन यकराच्या खळगाटावर 35 यकरावर हिरवाळंलय
तुपल्या माळं आन् बुक्क्या शप्पत आज्या,
तुव्ह्या घामाचा दिवा जळत राहील पिढ्यानपिढ्या
तुपल्या घामेजलेल्या मातीत उगलेलं मोती पाह्यला
आज्या तु जित्ता हवा होतास...
आज तु जित्ता हवा व्हतास !!!
(संतोष, 9-4-10, 12 pm. डेक्कनचौपाटी)
Thursday, April 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
simply amazing..!!!
Post a Comment