Thursday, March 10, 2011

तु अकाली बाई झाल्यावर...

काल,
तुझ्या अल्लडतेसह
उधळले पावसाचे चार चिंब थेंब,
सिटीप्राईडचे नाईट शो
पावसात भुरुभुरतं नाईट रायडिंग
आणि टपरीवरच्या चहासाठी
साऱ्या कोथरुडची पायपिट...

चतुश्रृंगीच्या पायऱ्यांवरील
खिचडीचे अर्धेर्धे घास...
क्षण तास प्रहर दिवसांशी
कवितेनं फुललेले श्‍वास

माझ्या कवितांवरुन फिरणारं
तुझ्या पापण्यांचं मोरपिस...
ओठांची थरथरती फुंकर
आणि पाठीवरची घट्ट बोटं...

आज,
तु अकाली बाई झाल्यावर...
मुकं आभाळ, मुकी कविता
मुक्‍या कवितेवर, मुक्‍या पापण्या
मुक्‍या साऱ्या भाव भावना
नुसतं मुकं मुकं जगणं...

दोन पावलांची अखंड पायपीट
रात्र रात्र अवकाळी पाऊस, पानझड
अन्‌ आठवणींचा चिखल नुसता
आपल्या मैत्रीच्या समाधीवर...

8 comments:

sach said...

waa. atishaya sundar....great pratimbha....jabardast

BinaryBandya™ said...

अप्रतिम
आवडली कविता

माझ्या कवितांवरुन फिरणारं
तुझ्या पापण्यांचं मोरपिस...
ओठांची थरथरती फुंकर
आणि पाठीवरची घट्ट बोटं...

छानच ..

Nilesh Gaikwad said...

Puneri mulinchi khari paristhiti saddhya ashich ahe sir!

sambhaji said...

lajavab.........mastch re bhau........

deva said...

तुझ्या कवितेत जान आहे
अल्लड भिरभिरत्या फुलपाखराचा प्राण आहे
तूझे शब्द असेच अमर होऊ देत
मैत्रीच्या ब्लॉगस्पॉट वर ओले चिंब न्हाऊ देत !!

जसा होशील तू भावनामय
निघतील शब्दांच्या मैफिली हृदयातून
अन विसावतील आपल्या मैत्रीच्या
उंबरठ्यावर नितांत . . . . . .

suhas said...

Hi santosh, i am very much glad and impressed with ur poems. i didn't know that u have this skill also. keep it up.

mani said...

}:) chan ahe re kavita!!!

Santosh Dukare said...

Thanks to all...
----------