Wednesday, July 27, 2011

गंध ओला...

गंध ओला, स्पर्श ओला
चिंब मने, भिजताती...
धुंद राती, चुंब राती
स्वप्नं सारी, हसताती...

श्‍वास दंग, देह दंग
रंग नवे, भरताती...
ओटी पाटी, उरी पान्हा
कोंब नवे, फुटताती...

(संतोष, 27 जुलै 2011, सकाळी 10, पुणे-सातारा हायवेवर)

1 comment:

ब्रह्मदेव आतकरी said...

वेगळी कल्पना सुंदर आहे .