खरं सांगतो
तुला तूच ठावूक नाहीस
जसा मला मी
अजून वाट संपली नाही
अन् दिवस बाकी कासराभर
अजून थोडं चालत राहू
कदाचित, त्या तिथं...
लाल रक्तिमेच्या इथं
सापडेल आपल्याला
माझ्यातील तू... अन् तुझ्यातील मी...
अजून थोडं चालत राहू
अजून थोडं चालत राहू
(संतोष, 11 जून 2010, 11.00 PM, शनिवारवाडा, पुणे)
No comments:
Post a Comment