12 महिने 365 दिवस झुरल्यावर
ती वाह म्हणते...
आन् त्या एका शब्दानेच,
आमची पालखी उठते...
दरवर्षी पावसाळा येतो,
सरींमागून उन पडतं...
हिरव्यागार गवतावर,
आमचं घोडं पेंड खातं...
दर वर्षी सालं असंच होतं,
पावसानं पालवी फुटते...
अन् ती वाह म्हटल्यावर
आमची पालखी उठते...
(संतोष, 12 जून 2010, रात्री 11.30, कोथरुड, पुणे)
Sunday, June 13, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment