विसरलेत शब्द आता...
भाव त्यांच्या जगण्याचा
तु वाचून बघ एकदा
अर्थ त्यांच्या भंगण्याचा
मुके शब्द वाचशिल कसे
ओठ शांत असताना
श्वास कधी खोलणार नाही
बंद पापण्यांच्या भावनांना
वाच हळू हळू
अन् बघ समजतोय का अर्थ
थोडं तुला समजलं तर
थोडं मलाही सांग जमलं तर
गरज नाही शब्दांना
आता अर्थ सांगण्याची
प्रत्येक वेळी घासून पुसून
तोच भाव उगळण्याची
शब्द म्हणजे भाव
शब्द म्हणजे स्वप्नं
शब्द म्हणजे अपेक्षा
अन् शब्द म्हणजे "दुःख'ही
शब्द म्हणजे वणवा
शब्दाने शब्दाला भिडणारा
शब्दांनेच पेटणारा
अन् ओठांनी विझणारा
तु फक्त पाहत रहा
वनवा माझ्या शब्दांचा
अन् चढू दे झालर नवी
तुझ्या स्वप्नांच्या साजाला
तु फक्त पाहत रहा
तु फक्त पेटत रहा
तु फक्त भोगत रहा
तु फक्त जगत रहा
येईल त्या क्षणाला
मिळेल त्या सुखाला...
जगता जगता जगत रहा
भोगता भोगता भोगत रहा
तुझ्या कवेतील आकाशाला
तुझ्या स्वप्नातील ताजव्याला
प्रत्येक पावलाची होईल मोहोर
आणि आज्ञा प्रत्येक श्वासाची
फक्त पाऊल पडू दे पुढं
द्याया फाटक्या नभा छाया
जगत रहा, झगडत रहा
लढत रहा, मढत रहा सदा
फक्त रिती असू दे ओंजळ
आणि जोडीला खुलं गाठोडं
(संतोष, 11 जून 2010, 10.15 PM, शनिवारवाडा, पुणे)
No comments:
Post a Comment